भजनी मालिका
← भजनांकडे परत

खंडन मुंडन दंडन करुनी घ्यती रुप । तें आम्हां सोपें झालें वर्णितां चिद्रुप

khandan mundan dandan karuni ghyati rup | ten amhan sopen jhalen varnitan chidrup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खंडन मुंडन दंडन करुनी घ्यती रुप । तें आम्हां सोपें झालें वर्णितां चिद्रुप ॥१॥ तो देखिला वो देखिला वो । पहाता पहाणें विसरुन गेलें ठक पडलें सकळां वो ॥२॥ नेति नेति शब्द भुलल्या वेडावल्या श्रुति । आगमनिगमां न कळे चोज चिंत्तीं ॥३॥ एका जनार्दनीं सकळ ब्रह्मा शोभा । अनुपम्य उभा कर्दळीचा गाभा ॥४॥