भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें

khelatan sanvala gadiyansi mhane | khel to pure gai jama karanen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खेळतां सांवळा गडियांसी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥ आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ सांडावया भाई ॥२॥ धांवती संवगडी पाठोंपाठ लवलाह्मा । गुंतल्या त्या गाई वळती न येती वळाया ॥३॥ येवोनि दीन मुख करिती हरिपुढें । एका जनार्दनीं तया पाहतां प्रेम चढें ॥४॥