भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

उदंड तीर्थ महिमा वर्णिला । परी नाहीं भेटला पांडुरंग ॥१॥ पंढरींसारखे तीर्थ महीवरी । न देखों चराचरीं त्रैलोक्यांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड तीर्थें क्षेत्रें पाहातां दिठीं । नाहीं सृष्टी तारक ॥१॥ स्नानें पावती मुक्ति जगा । ऐशी चंद्रभागा समर्थ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड तीर्थे पृथ्वींच्या ठायीं । ऐसा महिमा नाही कोणें जागीं ॥१॥ तया पुंडलीकें आम्हा सोपें केलें । परब्रह्य्मा उभे ठेलें विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड भक्त भाग्यवंत देखिले । परी निधान दाविलें पुंडलिकें ॥१॥ धन्य धन्य केला जगाचा उद्धार । नाहीं लहानथोर निवडिले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदंड मंत्र उदंड तीर्थे । परी पवित्र निर्धार पंढरीये ॥१॥ उदंड महिमा उदंड वर्णिला । परी या विठ्ठलावांचुनी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळां । आलीया अंगणीं ॥१॥ बोलती आणि संक्रोधें । थोर पीडेलें बाळकें ।चोरी करुनियां देखे । आला पळोनि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदयो अस्तु मावळलें भान । कर्माकर्मीं सहज समाधान ॥१॥ कर्म तें गेलें करणें हारपलें । सहजीं पारुषले धर्माधर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावियेला ॥१॥ हारपले विश्व विश्वभरपणे । दाविलें जनार्दनें स्वयमेव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदित तेथे परब्रह्मा उभें । सह्स्त्र कोंभ शोभे विटेवरी ॥१॥ कोटी सुर्य तेज लोपले तें प्रभे । तें असे उभे पंढरीये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उद्धव अक्रूर गोपाळ सवंगडे । हनुमंतादिक बागडे भक्त देखा ॥१॥ गुहक बिभीषण नळनीळ देखा । ऐशी भक्तामालिका शोभतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उद्धव बोले कृष्णाप्रती । ऐकोनि संतांचीं कीर्ति । धन्य वैष्णव होती । कलीमाजीं ॥१॥ तुम्हां जयाचा निजछंद । मानीतसा परमानंद । अखंड तयाचा वेध । तुमचें मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ