भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदंड तीर्थे पृथ्वींच्या ठायीं । ऐसा महिमा नाही कोणें जागीं

udand tirthe pruthvinchya thayin | aisa mahima nahi konen jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदंड तीर्थे पृथ्वींच्या ठायीं । ऐसा महिमा नाही कोणें जागीं ॥१॥ तया पुंडलीकें आम्हा सोपें केलें । परब्रह्य्मा उभे ठेलें विटेवरी ॥२॥ भुवैकुंठ पंढरी क्षेत्र । पवित्रा पवित्र उत्तम हें ॥३॥ म्हनोनी करा करा लाहें । एकदां जा हो पंढरीये ॥४॥ एका आगळें अक्षर । एका जनार्दनी निर्धार ॥५॥