भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदारपणें उदार सर्वज्ञ । श्रीजनार्दन उभा असे

udarapanen udar sarvadnya | shrijanardan ubha ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदारपणें उदार सर्वज्ञ । श्रीजनार्दन उभा असे ॥१॥ तयाचे चरणीं घातली मिठी । जाहली उठाउठी भेटी मज ॥२॥ अज्ञान हारविलें ज्ञान प्रगटलें । हृदयीं बिंबलें पूर्ण ब्रह्मा ॥३॥ एका जनार्दनीं नित्यता समाधी । वाउग्या उपाधी तोडियेल्या ॥४॥