भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा

udar dayal gurudatta | puravi het bhaktancha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥ त्याचे चरणीं लीन व्हावें । शुद्धभावें करुनी ॥२॥ मुखीं स्मरा गुरुदत्ता । नाहीं दाता दुसरा ॥३॥ पायीं करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावें ॥४॥ म्हणे एका जनार्दनीं । जनीं वनीं दत्त हा ॥५॥