भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावियेला

udar vishvacha dipaku tejacha | prakashu krupecha daviyela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावियेला ॥१॥ हारपले विश्व विश्वभरपणे । दाविलें जनार्दनें स्वयमेव ॥२॥ अकार उकार मकार शेवट । घेतिलासे घोट परब्रह्मीं ॥३॥ एका जनार्दनीं विदेह दाविला । सभराभरीं दाटला हृदयामाजीं ॥४॥