भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार संत एक जगीं । वागवितीं अंगीं सामर्थ्य

udar sant ek jagin | vagavitin angin samarthya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदार संत एक जगीं । वागवितीं अंगीं सामर्थ्य ॥१॥ काय महिमा वर्णू दीन । पातकीं पावन करिती जगीं ॥२॥ अधम आणि पापराशी । दरुशनें त्यांसी उद्धार ॥३॥ लागत त्यांच्या चरणकमळीं । पापतांपां होय होळी ॥४॥ एका जनार्दनीं भेटतां । हरे संसाराची चिंता ॥५॥