भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

इंद्रिये नाना छळती पामरें । समाधान शरीरें नोहे कधीं ॥१॥ त्याचा जो व्यापार करती सैरावैरा । परि त्या सर्वेश्वरा न भजती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इष्ट मित्र बंधु चुलते पुतणे । काळाचे पोसणें सर्व देख ॥१॥ यमाची यातना पडतां जीवा ती । कोणा काकुलती करसी मूढा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इहलोकीं बरा तो परलोकीं वंद्य । त्यासी भेदत्व निंद्य उरलें नाहीं ॥१॥ परस्त्री देखतां नपुंसक वागे । परधन पाहतां अंधापरी निघे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥ उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनियां पुसे राजा तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघड जगीं दिसोनियां कां झांकितीसी डोळां । पाहतां पाहतां खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥ नको खेळूं लंपडाई नको खेळूं लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडा अनुभव असोनिया देहीं । वायांचि प्रवाहीं कां पडसी ॥१॥ संसार दुस्तर कूप हा निर्धार । पडतां अंधकार सुटे जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥ देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरुं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडा विठ्ठल विटेवरी उभा । अनुपम्य शोभा दिसतसे ॥१॥ विटेवरी पाय जोडियले सम । तेंचि माझे धाम ह्रुदयीं राहो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्माचे दोष जाती ॥१॥ न करी आळस आल्या संसारीं । वदा निरंतरी विठ्ठलानाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उंच नीच नाहीं नामाचियां पुढें जातीचें तें गाढें नाहीं काम ॥१॥ अनामिकाहुनी असोत चांडाळ । परी नामाचा उच्चार मुखीं वसो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उच्चार नामाचा करी पां साचार । आळस निर्धारें टाकून देई ॥१॥ तें नाम सोपें निवृत्तीचें जाणा । कायावाचा मना जप करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाहीं कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥ जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊं तें कीर्तनीं दिननिशीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उठतां बैसतां खेळता बोलतां । चालतांनिजतां राम म्हणा ॥१॥ आसनीं शयनी भोजनीं परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उठोणि मध्यरात्रीं तेथें आला सांवळा । सुखसेजे पहुडली देखे गोपी बाळा ॥१॥ पती आणि गौळणी एके सेजे पहुडली । बैसोनियां सेजे विपरीत करणी केली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ