भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय बुललासी वरलीया रंगा

uns donga pari ras nohe donga | kay bulalasi varaliya ranga

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलीया रंगा ॥३॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥