भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों

udand nagavale vahavale purin | aisi yachi thori kay sangon

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥ ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥ इंद्रादि चंद्रा लावियेले काळें । कामाचिया बळें अहिल्येसी ॥३॥ प्रत्यक्ष शूळपाणि तपियां मुगुटमणी । तो हिंडविला वनीं भिल्लणीमागें ॥४॥ वृंदेचे घरीं विष्णु धरणें करी । अभिलाष करी मनें धरिला ॥५॥ चोखा म्हणे येणें बहु नाडियेले । काय आतां बोल जाय पुढें ॥६॥