भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप

utarale sukh chandrabhage tatin | paha valuvanti balarup

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥ बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥ जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥ चोखा म्हणे सर्व सुखांचे आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥