भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहो केशिराजा दूजे पैं धरितां । हें तों आश्रर्यता वाटे मज

kanho keshiraja duje pain dharitan | hen ton ashraryata vate maj

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
कांहो केशिराजा दूजे पैं धरितां । हें तों आश्रर्यता वाटे मज ॥१॥ एकासी आसन एकासी वसन । एक तेचि नग्न फिरताती ॥२॥ एकासी कदान्न एकासी मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न मागतांचि ॥३॥ एकासीं वैभव राज्याची पदवी । एक गांवोगांवीं भीक मागे ॥४॥ हाचि न्याय तुमचें दिसतो कीं घरीं । चोखा म्हणे हरी कर्म माझें ॥५॥