भजनी मालिका

भजने

हरीविण जिणें व्यर्थचि संसारीं । जग अलंकारी मिरवीत ॥१॥ देवाविण शब्द लटकें करणें । भांडा रंजविणें सभे-माजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरुनियां घ्यावें चित्त । आवघेंचि वित्त धन माझें ॥१॥ हें तों नव्हे उचित तुम्हां । पुरुषेत्तमा विचारा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरे भवभय व्यथा चिंतनें । दुर पळती नाना विघ्नें । कलीं कल्मष बंधनें । न बांधती चिंतनें ॥१॥ करा करा म्हणोनि लाहो । चिंतनाचा निर्वाहो । काळाचा तो बिहो । दुर पळे चिंतनें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हर्षा नमाये अंबरीं । येऊनियां झडकरी । द्वारा उघडी निर्भरी । आनंदमय ॥१॥ वृद्धा येऊनियां पाहें । उचलोनि लवलाहे । मुख चुंबिलें तें पाहें । कृष्णाचे देखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हवा हवा ह्मणताती श्रुति । परि त्या नेणती भुललीया ॥१॥ तुझिया रूपा नेणती अगा कमळापती । बाळक म्हणती गौळियाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हस्तीच्या चरणावरी बैसे माशी । नमन तयासी करावया ॥१॥ तैसें कायसें मी केवढें वापुडें । लागे कोणीकडे देवराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हा गे आलों कोणी म्हणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥१॥ तुम्ही तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम