भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं

harihar sanduni dev | dhariti bhav kshullakin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥१॥ ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भक्तांची ॥ध्रु.॥ अंगीं कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥२॥ गळां गांठा हिंडें दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥३॥ माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥४॥ पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥५॥ ऐशा छंदें चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥६॥ तुका म्हणे विष्णुशिवा । वांचुनि देवा भजती ते ॥७॥