भजनी मालिका
← भजनांकडे परत

हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड

haluhalu jad | hot chalilen ligad

हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । करिसी परि पुढें ॥१॥ मी तो सांगून उतराई । झालों आतां तुज काई । कळों येईल भाई । तैसा करीं विचार ॥२॥ मागें युगें अठ्ठावीस । जालीं दिवसांचा दिवस । मुदल व्याज कासावीस । होसी देवा ये कामें ॥३॥ तुकयाबंधु म्हणे राखें । आतां टाकी तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाउकें । झालें नाहीं खंडलेंसें ॥४॥