भजनी मालिका
← भजनांकडे परत

हर्षे आला प्रात:काळ उजळल्या दशदिशा

harshe ala prat:kal ujalalya dashadisha

रचनाकार: संत नागरी · अभंग
हर्षे आला प्रात:काळ उजळल्या दशदिशा। ऐका परमपुरुष उपवड । झाली कुरवंडिया लिंबलोण । झाले संतजन ब्रह्मरसे ॥। १॥ आदि मध्ये अंतु नाही त्या आनंदा । बोध जेथे सदा रामरामी।।धृ।। रामाच्या अन्य भक्तिरस प्रेमाचा बोरस । स्थाने चौरस पांडुरंगे । रामाच्या अनुभवे प्रेम तुंबळले । हृदयी बिंबले कृष्णरूप।।२।। रामसंतराने चालिले तेथूनि । तव देखिली कीर्तने मागे उभी। चित्रीची पुतळी दिसे पै तेजाळी । अंतरी जनमाळी सुरवाडला ||३|| देखोनिया रामा कोपला मानसी । करी धरुनि तिसी ब्राह्माटिले। ओकली गोवळी सासुरवासिणी । आलीसी टाकुनि वारगळे ।।४।। काये तुज पिडणी सांग झाले तेथे। स्वाछे कुंदते हृदय तुझे। शांतिचेनी पडिभरे दाटलिसे कंठी । शब्द न रिघे मिठी पडली वाचे ।।५॥ सकळही संतजन पाहाती विचारुनी । हे तव उन्मनी भोगीतसे । नेणे दुःखबाधा देहभाव नाटवी । विगुंतले केशवी चित्त इथे ||६|| ते निजव कळले का नामदेवा । लाधली हे देवा वैकुंठीचा । मग रामयाते म्हणे लाग इच्छा पाया। जाहाला भाग्योदयो आजि तुझा ।।