भजनी मालिका
← भजनांकडे परत

हमामा घाली बाळा । सांडी खोटा चाळा

hamama ghali bala | sandi khota chala

हमामा घाली बाळा । सांडी खोटा चाळा । फ़ोडिन तुझा टाळा । वाकुल्या दाविन काळा ॥१॥ हमामारे पोरा हमामारे ॥२॥ हमामा घाली बारे । अंगी भरलें वारें । चाखतीं पिकलीं चारें ॥ जाऊं वरिल्या द्वारेंरे पोरा ॥३॥ हमामा घालीं नेटें । सांडी बोलणें खोटें ॥ आतां जासिल कोठें । कान्होबाचे बळ मोठेंरे पोरा ॥४॥ हमामा घाली सोईं ॥ भांभाळी सवा दोहीं ॥ एक नेमें तूं राही । तेथें बहु सुख पाहीरे पोरा ॥५॥ हमामियाचा नादु वाजे ॥ अनुहातें कोपर गाजे ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल राजे । रत्नजडित मुगुट साजेरे पोरा ॥६॥