भजनी मालिका
← भजनांकडे परत

हमामा घाली राम अवतारीं । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविलें लंकेवरी

hamama ghali ram avatarin | kaikaichi bhid tula bhari | prasthan thevilen lankevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हमामा घाली राम अवतारीं । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविलें लंकेवरी ॥१॥ हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ॥ हमामा घाली नंदाघरीं । मिळोनि गौळियांच्या नारी । गोपाळ नाचती गजरीं ॥२॥ हमामा घाली पंढरपुरी । पुंडलीकाची भीड भारी । गोपाळ नाचती गजरीं ॥३॥ हमामा आषाडीकार्तिकीचा । साधुसंत गर्जती वाचा । एका जनार्दनीं म्हणे त्याचा ॥४॥