भजनी मालिका
← भजनांकडे परत

हनुमंत गेला सीताशुद्धिलागीं । लंका मध्यभागीं ये-ऊनियां

hanumant gela sitashuddhilagin | lanka madhyabhagin ye-uniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हनुमंत गेला सीताशुद्धिलागीं । लंका मध्यभागीं ये-ऊनियां ॥१॥ माता जानकीच्या करीत शुद्धीसी । हिंडे गृहदेशीं राक्षसांच्या ॥२॥ न देखे तो सती सीतादेवीमाया । अकस्मात तया वनामाजी ॥३॥ शिंसीवावृक्षाचे असे तळवटीं । समीप निकटीं राक्ष-सींचे ॥४॥ न चले उपाय कांहीं तो बोलाया । स्मरे रामराया तये काळीं ॥५॥ श्रीरामें मुद्रिका दिली होती संगें । तयासी अव्यंग सो-डावया ॥६॥ वृक्षाचिया माथां बैसोनियां बळी । देत करकमळीं सोडू-नियां ॥७॥ जानकी अवलोकी श्रीरामाची मुद्र । कोठोनी कपींद्रा आणलीसे ॥८॥ सुखी रामराणा कवणिये वना । माझिया तूं प्राणा बोलें वेगीं ॥९॥ ऐकोनी कपींद्र चरणासी वंदी । ह्मणे रामचंद्र सुखी असे ॥१०॥ सहितसौभित्र वनामाजी आहे । शुद्धीलागीं पाहे पाठविलें ॥११॥ तुझेनि वियोगें रामराजा दु:खी । यालागीं तुज देखीं पाठविलें ॥१२॥ ऐकतांची वाणी करीत आक्रोशा । ह्मणे राम कैसा सोडि-बोलतसे ॥१४॥ समीप जे होते रक्षपाळ बळी । ऐकोनी आरोळी दूर झाले ॥१५॥ तये संधीमध्यें हनुमंत खालौता । येवोनियां माता वंदितसे ॥१६॥ क्षुधाक्रांत भारी ह्मणे काय खाऊं । सांगसी उपाऊ तरी येथें ॥१७॥ वनामाजी मेवा घेऊनियां कांहीं । क्षुधेसी ते पाही शांतवावी ॥१८॥ म्हणे सीता दूता रक्षपाळ होती । नि-रोध करिती तुजलागीं ॥१९॥ ह्मणोनियां पाहीं भूमीगत कांहीं । घेऊनि स्वदेहीं विश्रांतीसी ॥२०॥ पडलें तें घेईं ऐसी आज्ञा पाही । वंदोनियं पायीं संतोषला ॥२१॥ करोनी उड्डाण वृक्षमाथां बैसे । उपडोनी झाडास हालवीत ॥२२॥ खालीं पाडी फळें तयांचें भोजन । करूनियां वन विध्वंसिलें ॥२३॥ रक्षपाळ सारे मिळोनी कपींद्रा । धरावया सारा यत्न केला ॥२४॥ न चढे हातासी बहुबळ त्यासी । राक्षसां विध्वंसी हातपायीं ॥२५॥ वृक्षाचेनि घायें मारिले उपायें । ऐसी बळ सोय दाखवीत ॥२६॥ जंबूमाळी बार्गीं तया अधिकार । धांवोनी सत्वर रायापाशीं ॥२७॥ मात ते घेउनि आला तो धांवूनि । कपीराज वनीं आला एक ॥२८॥ त्यानें सर्व वन पाडिलें उपडोन । कोणाचा तो कोण कळेना हो ॥२९॥ राजा करी आज्ञा धरा बांधा त्याला । मारा वानराला वेगीं जारे ॥३०॥ ऐक-तांचि वाणी भूपामुखींची हो । उआठेले लवलाहो राक्षसगण ॥३१॥ जावोनी वेढिला कपीराज राणा । धनुष्यासी बाणां लावूनियां ॥३२॥ मारितं बाणासी न लागे कपिसी । तेव्हां युक्ति कैसी आरंभिली ॥३३॥ करूनि फांसासी धरूं ह्मणती त्यासी । नये तो फांसासी आटोपितां ॥३४॥ धरिती जरी बाहीं निघोनियां जातां । न चढे तो हातां कवणाच्या ॥३५॥ थोर जरी फांसा होत तो लहान । जाय तो निघोन फाशांतुनी ॥३६॥ लहान जरी केला तरी होतो थोर । फांशाचा विचार व्यर्थ करीती ॥३७॥ ऐशापरी झाले श्रमातुर भारी । कपि तो विचारी कार्य पुढें ॥३८॥ ह्मणोनी फांशांत पडे तो तेधवां । धरोनी वानरा नेती दूत ॥३९॥ सन्मुख रावणें देखुनि कपीसी । करी कौतुकासी अपूर्व हो ॥४०॥ कधीं नाहीं ऐसें स्वरूप देखिलें । येणें फार केलें नाशालागीं ॥४१॥ पुसत तूं कोण कवण कार्यालागीं । पातलासी वेगीं याच ठायीं ॥४२॥ वानर म्हणे आलों मूर्खा रावणारे । रामदूत खरे सीताशुद्धि ॥४३॥ ऐकोनि रावण म्हणे यासी जाळा । शेंपूट गुंडाळा अग्नि लावा ॥४४॥ कपीसी पुसिलें म-रण कोणे ठायीं येरू पुच्छ दावी म्हणोनियां ॥४५॥ समग्र लंकेचीं आणोनियां वस्रें । कपीपुच्छ पुरें न होयची ॥४६॥ तेव्हां राजधीनी आणोनी वेष्टितां । परी तो पुरतां न होयची ॥४७॥ तेव्हां तेल घाला म्हणे तो रावण । दूत ते धांवोन टाकिताती ॥४८॥ लावूनि अग्निसीं केला मोठा ज्वाळ । वानर तत्काळ उडाला हो ॥४९॥ लंकेची ते केली सारी तेणें होळी । सहित मंडळी राजघरें ॥५०॥ भुकुक्कार केला वानर उडाला । लंकेमाजी झाला प्रळय हो ॥५१॥ अग्नीचा उबाळा धुरानें दाटला । देखे कपि त्याला सुखरूप ॥५२॥ मुखासी लागला पाहतांची डोळां । म्हणोनी तो झाला शामवर्ण ॥५३॥ येवोनि लवलाहीं श्रीरा- मातें पाही । नमूनि सर्वही सांगितलें ॥५४॥ तेव्हां नामा म्हणे होतों मी जवळा । चरणकमळां ध्यात तेथें ॥५५॥