भजनी मालिका
← भजनांकडे परत

हमामा घालूं सोई । सांभाळूं शिवा दोही

hamama ghalun soi | sambhalun shiva dohi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हमामा घालूं सोई । सांभाळूं शिवा दोही ॥१॥ हमामा रे भाई । कान्होबाचे बळे घालुं हमामा ॥२॥ हमामा घालुं ऐसा । भक्तिबळें कान्होबा बैसा ॥३॥ हमामा घालूं नेटें ।एका जनार्दनांचे बळ मोठें ॥४॥