भजनी मालिका

भजने

सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥ विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्व सुखरासी भिंवरेचे तीरीं । आमुची पंढरी काम-धेनू ॥१॥ प्रेमासृतें दुभे सदा संतजनां । वोसंडतो पान्हा नित्य नवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्या ॥१॥ पताकांची छाया दुणावली फार । सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हां जाले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलांचें नाम । दुजा नाहीं काहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ