भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी

sarva sangin vit ala | tun ekala avadasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥ बहु जालों खेदक्षीण । येणें सीण तो नासे ॥२॥ तुका म्हणे गंगेवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥