भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्या

sarva svasti kshem vaishnav mandali | baisaleti pali samadhichya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्या ॥१॥ पताकांची छाया दुणावली फार । सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हां जाले ॥२॥ अजानवृक्षदंड आरोग्य अपार । समाधीसमोर स्थापियेला ॥३॥ कोरड्या काष्टीं फुटियेला पाला । तेव्हां अवघियाला नमस्कारी ॥४॥ नामा म्हणे देवा घार गेली उडोन । बाळें दाणादाण पडियेली ॥५॥