भजनी मालिका

भजने

सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥ पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सर्वांग साजिरीं आहेती इंद्रियें । तंव सावध होय हरीकथे ॥१॥ कीर्तन नर्तन वाचे जनार्दन । न पावसी पतन येरझारीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे । सभोंवतें तरुवर चंदन करिताचि जाये ॥१॥ धणी धाय परी परी त्याची भुक्ति न धाये । सागर भरिता परी त्या सरिता समाये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वाघटीं बिंबला व्यापुनी राहिला । पुडलिकें उभा केला विटेवरी ॥१॥ सांवळा चतुर्भुज कांसे पीतांबर । वैजयंती माळ शोभे कंठीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । नामयाचें लग्न करावें तें ॥१॥ जाऊनियां स्वयें देवें माव केली । सोयरीक आणिली नामयासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । बाळपणींचा जाण सुदामा तो ॥१॥ उठोनि सत्वर धावें आलिंगना । वैकुंठीचा राणा लवलाहे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वांचे जे मूळ सर्वांचे जें स्थळ । तें पद्ययुगलु विटेवरी ॥१॥ साजिरें साजिरें कर दोन्हीं कटीं । उभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वाठायीं ज्याची सत्ता । तो भक्ताधीन तत्त्वता ॥१॥ ज्याची आज्ञा प्रमाण । बारा अंगुळें विचरे प्राण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सर्वादि सर्वसाक्षी तो । विश्वंभर खल्विद तो गे बाई ॥१॥ आनंदा आनंद तो । प्रबोधा प्रबोध तो गे बाई ॥ध्रु०॥

सर्वाभुतीं तुझें रुप । हृदयीं सिद्धची स्वरुप ॥१॥ इतुलें देईं अधोक्षाजा । नाहीं तरी घोट भरीन तुझा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ