भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व सुखरासी भिंवरेचे तीरीं । आमुची पंढरी काम-धेनू

sarva sukharasi bhinvareche tirin | amuchi pandhari kam-dhenu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्व सुखरासी भिंवरेचे तीरीं । आमुची पंढरी काम-धेनू ॥१॥ प्रेमासृतें दुभे सदा संतजनां । वोसंडतो पान्हा नित्य नवा ॥२॥ धर्म अर्थ काम मोक्ष चार्‍ही थानें । दोहोणार धन्य पुंडलीक ॥३॥ जयाचें दुभतें नित्य नावें वाढतें । बहु पंढरीतें पुर्वपूण्य ॥४॥ भक्तिचेनि बळें भावाचेंनि मेळें । देखोनियां बोले बहु फार ॥५॥ भाग्यवंत नामा तें क्षीर लाधला । प्रेमें वोसंडला गर्जे नाम ॥६॥