भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी

sarva sukhachi lahari | dnyanabai alankapuri

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥ शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥ वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ॥३॥ ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥