भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वकाल ध्यान हरिरुप ज्याचे

sarvakal dhyan harirup jyache

रचनाकार: संत सोपान · अभंग
सर्वकाल ध्यान हरिरुप ज्याचे । तथा सर्व रुप साचे जवळी असे ॥ हरि हरि जाला प्रपंच अबोला । हरिसुख निवाला तोचि धन्य ।।१।। हरि हरि जाला प्रपंच अबोला । हरिसुख निवाला तोची धन्य।।२।। हरि हेचि मन संपन्न अखंड । नित्यता ब्रह्मांड त्याचे देही ।।३।। सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु । हरि रूपी रतु जीव शिव ॥४॥