भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदोदित मना निवृत्तीचे पायीं । मना आणिक ठायीं जाऊं नको

sadodit mana nivruttiche payin | mana anik thayin jaun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदोदित मना निवृत्तीचे पायीं । मना आणिक ठायीं जाऊं नको ॥१॥ जपतप काहीं न करीं साधन । तुटेल बंधन निवृत्तिनामें ॥२॥ तीर्थ व्रत चाड न धरीं अहंकार । नामाचा उच्चार निवृत्ति करी ॥३॥ तीर्थाचें हें तीर्थ निवृत्ति माहेर । एका जनार्दनीं निर्धार निवृत्तिपायीं ॥४॥