भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा सर्वकाळ मनीं वसे देव । तेथें नाहीं भेव कळिकाळाचा

sada sarvakal manin vase dev | tethen nahin bhev kalikalacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदा सर्वकाळ मनीं वसे देव । तेथें नाहीं भेव कळिकाळाचा ॥१॥ काळ तो पुढरी जोडितसे हात । मुखीं नाम गात तयापुढें ॥२॥ म्हणोनि आदरें वाचे नाम घ्यावें । रात्रंदिवस ध्यावें विठ्ठलासी ॥३॥ एका जनार्दनीं जपतां नाम होटीं । पुर्वजां वैकुंठी पायवाट ॥४॥