भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळांचे डाळ मुळ आवघाचि गोपाळ

sakalanche dal mul avaghachi gopal

रचनाकार: संत बोधले · अभंग
सकळांचे डाळ मुळ आवघाचि गोपाळ । न कळे त्याचि कळ ब्रह्मादिका ॥१॥ जया जैसा भाव त्यासि तैसा देव योगिया । अनुभव घेऊनि राही ॥२॥ उदक पाहे जीवन तेथे । वसवी लवण दोहीस भिन्नपण कैचे तेथे ॥३॥ जैसे पाहे कनक अळंकार अनेक । तैसा राम मी व्यापक मूर्ख नेणे ॥४॥ देहे पाहे चाळविता बुधि पाहे खेळविता । ज्याचा जैसे चिता उपावो करि ॥५॥ ऐसाच भ्रमणी फिरतसे जनिवनी । परि बरे वाईट दोन्ही ऐक राम ॥६॥ बोधला म्हणे कळे नकळे त्याचे खेळ । कैसा नाटक गोपाळ खेळ खेळ ॥७॥