भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकाम निष्काम वदे नामावळी । सर्व दोषां होळी नाम मंत्रें

sakam nishkam vade namavali | sarva doshan holi nam mantren

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकाम निष्काम वदे नामावळी । सर्व दोषां होळी नाम मंत्रें ॥१॥ सोपाचि मंत्र नाहीं अवघड । तें जपा उघड रामनाम ॥२॥ यातीहिन असो भलते नारीनर । वाचे जो उच्चारी रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें शरण । वाचे नारायण जप करा ॥४॥