भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळाठायीं भगवदाव । हाचि अनुभव जयाचा

sakalathayin bhagavadav | hachi anubhav jayacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सकळाठायीं भगवदाव । हाचि अनुभव जयाचा ॥१॥ त्याच्या चरणीं लीन व्हावें । उध्दरावें कृपेनें ॥२॥ मावळले कामक्रोध । वृत्ति सन्निध हरीच्या ॥३॥ निळा म्हणे त्याच्या नामें । पापें अधर्म नासती ॥४॥