भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ नगरी वाहिली विमानीं । वैकुठ भुवनीं पावविला

sakal nagari vahili vimanin | vaikuth bhuvanin pavavila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ नगरी वाहिली विमानीं । वैकुठ भुवनीं पावविला ॥१॥ करा एकादशी जागर कीर्तन । द्वादशी भोजन द्विजपंक्ती ॥२॥ दिवसा सावध हरीचें चिंतन । रात्रीं जागरण कीर्तनसार ॥३॥ एका जनार्दनीं साधावें हें व्रत । तेणे मोक्ष प्राप्त अर्धक्षणीं ॥४॥