भजनी मालिका

भजने

श्रीरामासी राज्याभिषेचन । इंद्रादिकां चिंता गहन । समस्त देवमिळोन । चतुरानन विनिविला ॥१॥ देव म्हणती ब्रह्मायासी । तुझें आश्वासन आम्हांसी । श्रीराम अवतार सुर्यवंशीं । तो रावणासी वधील ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीविठ्ठलें आपुल्या मुखवचनें । नामदेवासी करी अज्ञापन । होवोनि दीनाचें अति दीन । सद्‌गुरूसी शरन रिघावें ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीशंभुचें आराध्य दैवत । क्षणीं वैकुंठीं क्षीरसागर । जयालागीं योगी तप तपती समस्त । तो सांपडला आम्हां कीर्तनरंगांत ॥१॥ धन्य धन्य कीर्तन भूमंडळी । महादोषां होतसे होळी । पूर्वज उद्धरती सकळीं । वाहतां टाळी कीर्तनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥१॥ विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

श्रीहरि श्रीहरि ऐसें वाचे म्हणेन । वाचा धरिसी तरी श्रवणें ऐकेन ॥१॥ श्रावणीं दाटसी तरी मी नयनीं पाहिन । ध्यानीं मी ध्याईन जेथें तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्रीहरिच्या संकीर्तनें । तुटलीं बंधनें बहुतांची ॥१॥ होऊनियां उपरती । राजा परीक्षिती उध्दरला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रुतिशास्त्रां अति दुरी । तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं । क्रीडतु राम ॥१॥ क्षण एक नमस्कारा । नातुडे सुरवरा । तो रिसां आणि वानर क्षेम देतो राम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रुतीदेवाच्या कणिया खाणें । श्रलाध्य अन्नें विदुराच्या ॥१॥ द्रौपदीहातींचे भाजीपान । मानी समान पंचामृता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

श्रुतीशास्त्रांचा आधार । पुराणांचा परिकर । दरुशनें सांगती आधार । वाचे नाम उच्चारा ॥१॥ तारक जगीं हें नाम । जपतां निष्काम सकाम । पावे स्वर्ग मोक्ष धाम । कलिमाजीं प्रत्यक्ष ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रृंगीचिया अंगी कोणते हो वह शरिर अनादळ केली आळी ॥१॥ काय तिने तपमुद्रा परिवेली म्हणोनियां झाली भृंगी अंगे॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

श्रोते ह्मणती विष्णुदासा । या ब्रह्मांडींचा प्रळय कैसा । पंढरीच्या भास । नाश कीं नाहीं ॥१॥ तंव नामा ह्मणे सुदर्शना-वरी । देवें रचिली पंढरी । भक्तांसहित राज्य करी । रुक्मिणीवर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥ तेणें समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥ नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥ माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम