भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत

sakal devanchen daivat | ubhen ase ranga ant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥१॥ रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥ रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥२॥ तुका लुटितां हे रंग । साह्य जाला पांडुरंग ॥३॥