भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ प्रपंचाचे भान । तें तंव मृगजळासमान

sakal prapanchache bhan | ten tanv mrugajalasaman

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ प्रपंचाचे भान । तें तंव मृगजळासमान ॥१॥ जन्ममरणापरता । त्रिगुणातें नातळता ॥२॥ प्रपंचाची अलिप्त युक्ति । ऐसी आहे देहस्थिती ॥३॥ प्रपंची न दिसे भान । एका शरण जनार्दन ॥४॥