भजनी मालिका

भजने

शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शोधूनी अन्वये वंशवंशावळी । परंपरा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविले पूर्वी जैसे होते तैसे । केले सामरस्यें समाधान ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

शोभती दोनी कटीं कर । रुप सांवळें सुंदर । केशराची उटी नागर । गळां माळ वैजयंती ॥१॥ वेधें वेधक हा कान्हा । पहा वेधतुसे मना । न बैसेचि ध्याना । योगियांच्या सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥ भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंख चक्र मिरवे करीं ॥१॥ आला पुंडलिका कारणें । आवडी कीर्तनें धरुनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरीं कोवळीं तीं ॥१॥ ध्वजवज्रांकुश चिन्हें मिरवती । कटीं धरीले कर अनुपम्य शोभती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

श्रमोनी वाउग्या बोलती चावटी । परी हातवटी नये कोणा ॥१॥ ब्रह्माज्ञानी ऐसे मिरविती वरी । क्रोध तो अंतरीं वसतसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ