भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्यानाचिया घरा वासना पैं नेती

shyanachiya ghara vasana pain neti

श्यानाचिया घरा वासना पैं नेती । मनें मन गुंती तये रुपीं ॥ बिंबाचे रुपस छाया पै घनदाट । दिननिशीं अविट श्यामतेज ॥१॥ तें रुप देखिलें कोण्या भाग्ययोगें । निवॄत्तिप्रसंगे आम्हां घरीं ॥२॥ दिठिवेचेनि वोपें सानुलें स्वरुप । नुराली वालिप कल्पनेची ॥ सांठवले आकार इद्रियांच्या वॄत्ति । श्यामतेजें दिप्तीं धवळलें ॥३॥ निराशा संचली आशा पै सार । अनादी अमर तनु जाली । बापरखुमादेविवर विठ्ठलीं गळालें । ब्रह्मसुख सोहळे आम्हां घरीं ॥४॥