भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण

shodhuni anvay vansh vanshavali | paraspara kulin uchcharan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥१॥ म्हणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥ एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहात ध्वनी गगन गर्जे ॥२॥ तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥३॥