भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोधुनियां आले संत । हिताहत जगाचें

shodhuniyan ale sant | hitahat jagachen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
शोधुनियां आले संत । हिताहत जगाचें ॥१॥ तेचि वचनें अनुवादती । सकळां नीतिप्रमाणें ॥२॥ सत्यासत्य ठावें तया । पाहोनियां ठेविलें ॥३॥ निळा म्हणे गुंता गोवा । कांहिंचि जिवा न करिती ॥४॥