भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोधितां चि नये । म्हणोनि वोळगतों पाये

shodhitan chi naye | mhanoni volagaton paye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शोधितां चि नये । म्हणोनि वोळगतों पाये ॥१॥ आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥ परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥२॥ विसरला तुका । बोलों चालों झाला मुका ॥३॥