भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्यामाचि श्यामशेज वरी

shyamachi shyamashej vari

श्यामाचि श्यामशेज वरी । तेज विराजे सहजें केशिराज क्षीरार्णवीं ॥ १ ॥ शेषशयन अरुवारी गोविंद क्षीरसागरीं । तो नंदयशोदेघरीं क्रीडतुसे ॥ २ ॥ अनंत नामीं क्षीर क्षरलासे साचार । गोपिकासमोर हरीराजा ॥ ३ ॥ नाहीं योगिया दृष्टि मनोमयीं करि सृष्टि । पाहातां ज्ञानदृष्टी विज्ञान हरि ॥ ४ ॥ शांति नेणें क्शमे पारु विश्रांतिसी अरुवारु । तो कैसा पा उदारु गोपाळांसी ॥ ५ ॥ विचाराचें देटुगें आकार निराकार सांगे । तो गोसावी निगे गोकुळीं रया ॥ ६ ॥ निवृत्तीचें परब्रह्म नामकृष्ण विजय ब्रह्म । चिंतितां चिंताश्रम नासोनि जाय ॥ ७ ॥