भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी

shmashan te bhumi pretarup jan | sevabhaktihin gramavasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
श्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥ भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥ अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥ तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥