भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्रत जे करिती तया जे निंदिती । त्याचे पूर्वज जाती नरकामधीं

vrat je kariti taya je ninditi | tyache purvaj jati narakamadhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
व्रत जे करिती तया जे निंदिती । त्याचे पूर्वज जाती नरकामधीं ॥१॥ भाळे भोळे भक्त वेडें वांकुडें गाती । तया जे हासती ते श्वानसम ॥२॥ स्वमुख देव आवडीने सांगे । तयाचिये मागें हिंडे देवो ॥३॥ एका जनार्दनीं भोळा देव । भक्ताचा गौरव करीतुसे ॥४॥