भजनी मालिका
← भजनांकडे परत

विधियुक्त नोहे संध्यास्नान । तेणें घडें पतन कल्पकोटी

vidhiyukta nohe sandhyasnan | tenen ghaden patan kalpakoti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विधियुक्त नोहे संध्यास्नान । तेणें घडें पतन कल्पकोटी ॥१॥ रेचक पूरक कुंभक ब्रहाटक । प्राणायाम देखन साधेचि ॥२॥ मूळ मंत्र न्यास विधि बीज । न घडतां सहज दोष लागे ॥३॥ हृदय कवच शिखा शिरीं । नेत्र अस्त्रादिक फटकारीन साचे ॥४॥ एका जनार्दनीं यातायाती । पुढें फजिती जन्मोजन्मीं ॥५॥