भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलेंविण जया न गमे एक घडी । सर्वस्व आवडी विठ्ठालाची

viththalenvin jaya na game ek ghadi | sarvasva avadi viththalachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठलेंविण जया न गमे एक घडी । सर्वस्व आवडी विठ्ठालाची ॥१॥ विठ्ठालचि माता विठ्ठालचि पिता । भगिनी आणि भ्राता विठ्ठालचि ॥२॥ विठ्ठालचि क्रिया विठ्ठालचि कर्म । विठ्ठाल सकल धर्म कुळदैवत ॥३॥ गुज गौप्य जीविचें विठ्ठाल सांगावे । विठ्ठालें पुर-वावें कोड त्याचें ॥४॥ सर्वकाळ करणें विठ्ठालाची कथा । विठ्ठाल जडला चित्ता जयाचिया ॥५॥ विठ्ठाल जागृति स्वप्र आणि सुषुप्ति । अखंड वदती विठ्ठाल विठ्ठाल ॥६॥ ऐसें सर्वस्वेसीं विठ्ठाल भजतां । सुख आलें हातां विठ्ठालाचे ॥७॥ नामा ह्मणे त्याचे चरणरज होऊन । जाहलोंसे पावन ह्मणे आतां ॥८॥