भजनी मालिका
← भजनांकडे परत

विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं

vidhi ved viruddha samparka sambandh | nahin bhedabhed svasvarupin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥ अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥ स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद । उचित तें शुद्ध ज्याचें तया ॥३॥ म्हणोनियां संतीम अवश्य आचरावेम । जनां दाखवावें वर्तेनियां ॥४॥ कुळींचा कुळधर्म अवश्य पाळावा । सर्वथा न करावा अनाचार ॥५॥ प्रत्यवाय आहे अशास्त्रीम चालतां । पावन अवस्था जरी जाली ॥६॥ ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ति । बोलिली पद्धती धर्मशास्त्रीं ॥७॥