भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा

vital to paradravya paranari | yethuni jo duri to sonvala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥ गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुद्धी करुनी ठेवा ॥ध्रु.॥ विचाराचें कांहीं करारे स्वहित । पापपुण्यांतीत भांडवल ॥२॥ तुका म्हणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखेंचि ॥३॥