भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटिया दांडू मांडिती खेळा । मेळवूनि मेळा संवगडियांचा

vitiya dandu manditi khela | melavuni mela sanvagadiyancha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
विटिया दांडू मांडिती खेळा । मेळवूनि मेळा संवगडियांचा ॥१॥ सुं म्हणोनियां मारिती टोला । हांसती त्याला डाव घेतां ॥२॥ धांवती एक ते उभेचि ठाकती । जिंकोनियां मानिती आपण धन्य ॥३॥ निळा म्हणे खेळ मोडा रे गडि हो । कान्होबाचे पाहों पाय आतां ॥४॥